भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वरुपाचेनि भानें बिंब हें ग्रासिलें

svarupacheni bhanen bimb hen grasilen

स्वरुपाचेनि भानें बिंब हें ग्रासिलें । परि खुण न बोले काय करुं ॥ रुपाचा दर्पण रुपेंविण पाहिला ॥ द्रष्टाहि निमाला नवल कायी ॥१॥ जिकडे जाय तिकडे दर्शन सांगाती ॥ उदो ना अस्तु हे नाहीं द्वैतस्थिति ॥२॥ पूर्वबिंब शून्य हे शब्दचि निमाले ॥ अनाम्याचे नि भले होतें सुखें ॥ त्यासी रुप नांव ठाव संकल्पे आणिला । अरुपाच्या बोला नाम ठेला ॥३॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि एक ॥ भोगी समसुख ऐक्यपणें ॥ अदृश्य अंबुला जागताम निविजे ॥ परि सेज स्वभावीं दुजें नाहीं रया ॥४॥