भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वरुपाचें ध्यानीं निरंजन पाहिलें

svarupachen dhyanin niranjan pahilen

स्वरुपाचें ध्यानीं निरंजन पाहिलें । डोळ्यानें दाविलें चराचर ॥१॥ आतां माझें नयन नयनीं रिघों पाहे । नयना नयनीं राहे नयनची ॥२॥ ज्ञानदेवा नयन निवृत्तिने दाविला । सर्वा ठायीं झाला डोळा एक ॥३॥