भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नी ती हि कैसा न पडसी डोळा । सुंदर सावला घवघवीत

svapni ti hi kaisa na padasi dola | sundar savala ghavaghavit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्वप्नी ती हि कैसा न पडसी डोळा । सुंदर सावला घवघवीत ॥१॥ चतुर्भूज माळा रुळे येकावळी । कस्तुरी निढळीं रेखिलीसे ॥ध्रु.॥ शंक चक्र गदा रुळे वैजयंती । कुंडले तळपती श्रवणीं दोन्ही ॥२॥ तुका म्हणे स्वप्नी दावी आतां पाय । पांडुरंगे माया कृपावंते ॥३॥