भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचें । काय त्या प्रेमाचें सुख मज

svamisi sankat pade je goshtichen | kay tya premachen sukh maj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचें । काय त्या प्रेमाचें सुख मज ॥१॥ दुःखवीना चित्त तुझें नारायणा । कांहीं च मागेना तुजपासीं ॥ध्रु.॥ रिद्धि सिद्धि मोक्ष संपित्त विलास । सोडियेली आस यांची जीवें ॥२॥ तुका म्हणे एके वेळे देई भेटी । वोरसोनि पोटीं आळिंगावें ॥३॥