भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुटायाचा कांहीं करितो उपाय । तों हे देखें पाय गोवियेले

sutayacha kanhin karito upay | ton he dekhen pay goviyele

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुटायाचा कांहीं करितो उपाय । तों हे देखें पाय गोवियेले ॥१॥ ऐसिया दुःखाचे सांपडलों संदी । हारपली बुद्धी बळ माझें ॥ध्रु.॥ प्रारब्ध क्रियमाण संचिताचें । वोढत ठायींचे आलें साचें ॥२॥ विधिनिषेधाचे सांपडलों चेपे । एकें एक लोपे निवडेना ॥३॥ सारावें तें वाढे त्याचिया चि अंगें । तृष्णेचिया संगें दुःखी जालों ॥४॥ तुका म्हणे आतां करीं सोडवण । सर्वशिक्तहीन जालों देवा ॥५॥