भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुरवर येती तीर्थे नित्यकाळ । पेंठ त्या निर्मळ चंद्रभागा

suravar yeti tirthe nityakal | penth tya nirmal chandrabhaga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुरवर येती तीर्थे नित्यकाळ । पेंठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥१॥ साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ध्रु.॥ पंचक्रोशीमाजी रीग नाहीं दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥२॥ निर्विषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरीं ब्रह्मानंदु ॥३॥ तुका म्हणे ज्यापें नाहीं पुण्यलेश । जा रे पंढरीस घेई कोटि ॥४॥