भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुराणीचीं झालों लाडिकीं एकलीं । वडील धाकुलीं आम्ही देवा

suranichin jhalon ladikin ekalin | vadil dhakulin amhi deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुराणीचीं झालों लाडिकीं एकलीं । वडील धाकुलीं आम्ही देवा ॥१॥ म्हणऊनि कांहीं न घडे अव्हेर । गोमटें उत्तर भातुकें ही ॥ध्रु.॥ कांहीं एक नाहीं वंचिलें वेगळें । मुळिचया मुळें स्थिरावलें ॥२॥ लेवविलो अंगीं आपलीं भूषणें । अळंकार लेणें सकळ ही ॥३॥ सारितां न सरे आमुप भांडार । धना अंतपार नाहीं लेखा ॥४॥ तुका म्हणे आम्ही आळवूं आवडी । म्हणऊनी जोडी दाखविली ॥५॥