भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुनीळ गगना पालटु । तैसा दिसे अंगीं नटु । कृष्णी बाणलासे नीळवर्णु गे माये

sunil gagana palatu | taisa dise angin natu | krushni banalase nilavarnu ge maye

सुनीळ गगना पालटु । तैसा दिसे अंगीं नटु । कृष्णी बाणलासे नीळवर्णु गे माये ॥१॥ यमुनेच्या पाबळीं । तनु घेउनि सांवळि । पावा वनमाळी वाजतु आसे ॥ध्रु०॥ पांवयाचेनि नादें । कृष्णाचेनि वेधें अमृतघनु वोळला । आकाश वोळुनि वर्षाव झाला ब्रह्मरसपूर आलारे ॥२॥ कान्हा अति सुंदर वदनारविंद आळी सेविती अनिवाररे आयो ॥३॥ चंदनादिटिळकुलल्लाटीं जया साजे मोर विसावेटी रेआयो । सुरतरु कुसुमें कबरीं भारुरे कुंडलें झळकति कपोळीं रे आयो ॥४॥ बाप रखुमादेविवरु विठ्ठलुरे । त्रिभुवनजनमोहन रे आयो ॥५॥