भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुंदर सुरेख वोतिलें । परब्रह्म तेज फ़ांकलें । तें व्योमीं व्योम सामावलें । नयनीं वो माय

sundar surekh votilen | parabrahma tej फ़ankalen | ten vyomin vyom samavalen | nayanin vo may

सुंदर सुरेख वोतिलें । परब्रह्म तेज फ़ांकलें । तें व्योमीं व्योम सामावलें । नयनीं वो माय ॥१॥ कमळनयन सुमन फ़ांकलें । त्या परिमळा आथिलें । मकरंदीं वो माय ॥ध्रु०॥ संकोचला संसार । पारुषला व्यवहार । ब्रह्मानंद अपार । जहाला वो माय ॥२॥ मधुर वेदवाणी । न पवे ज्याच्या गुणीं । तें ठकावलें निर्वाणीं । नेति मुखें वो माय ॥३॥ यापरतें बोलणें । न बोलणें होणें । तें म्यां आपुल्या अंगवणें । केलें वो माय ॥४॥ ऐसियाते वोटी । लागलें तयाचे पाठी । रखुमादेविवरा भेटी । विठ्ठलीं वो माय ॥५॥