भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखीं सुख मुरे तेथें कोण झूरे

sukhin sukh mure tethen kon jhure

सुखीं सुख मुरे तेथें कोण झूरे । जळी लवण विरें तैंसे जालें ॥१॥ ज्ञान ते विज्ञान प्रंपचेंसि भान । तेजोरुप गगन बिंबलें दिसे ॥२॥ आत्मा आत्मरुप परमात्मा समीप । कोटि कोटिरुप एकलेंचि दिसें ॥३॥ नाना तेजी भासे प्रपंचप्रकाशे । विरुळा समरमें ध्याये त्यासी ॥४॥ ऐसे जालें तुज प्रगटलें निज । कासवीचें बीज अंकुरलें ॥५॥ निवृत्ति निजबोध आनंदादि कंद । शाखाद्वमभेद हरि जाला ॥६॥