भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखें न मनी अवगुण । दुःख भोगी त्याचें कोण

sukhen na mani avagun | duhkh bhogi tyachen kon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुखें न मनी अवगुण । दुःख भोगी त्याचें कोण ॥१॥ हें कां ठायींचें न कळे । राती करा झांकुनि डोळे ॥ध्रु.॥ चालोनि आड वाटे । पायीं मोडविले कांटे ॥२॥ तुका म्हणे कोणा । बोल ठेवितो शाहाणा ॥३॥