भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखें होतो कोठे घेतली सुती । बांधविला गळा आपुले हातीं

sukhen hoto kothe ghetali suti | bandhavila gala apule hatin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुखें होतो कोठे घेतली सुती । बांधविला गळा आपुले हातीं ॥१॥ काय करूं बहु गुंतलों आतां । नयेचि सरतां मागें पुढें ॥ध्रु.॥ होते गांठी तें सरलें आतां । आणीक माथां ऋण जालें ॥२॥ सोंकरोलियाविण गमाविलें पिक । रांडापोरें भिके लावियेलीं ॥३॥ बहुतांचीं बहु घेतलीं घरें । न पडे पुरें कांहीं केल्या ॥४॥ तुका म्हणे काही न धरावी आस । जावे हे सर्वस्व टाकोनिया ॥५॥