भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख सेजारीं असतां कळि जाली वो पाहंतां

sukh sejarin asatan kali jali vo pahantan

सुख सेजारीं असतां कळि जाली वो पाहंतां । देठु फ़ेडूनि सेवतां अरळ केलें ॥१॥ अंगणीं कमळणी जळधरु वोले करी । वाफ़ा सिंपल्यावरी वाळून जाये ॥२॥ मोतियाचें पाणी वाहे निळिये सारणी । गुणाची लावणी लाऊनि गेला ॥३॥ अंगणीं वोळला मोतें वरुषला । धन्य दिवसु जाला सोनियाचा ॥४॥ चोरट्या मधुकरा कमळीं घेतलासे थारा । मोतियांचा चारा राजहंसा ॥५॥ अंगणीं बापया तूं परसरे चांपयां असुवीं माचया भीनलया ॥६॥ वाट पाहे मीं येकली मज मदन जाकली । अवस्था धाकुली म्हणोनिया ॥७॥ आतां येईल ह्मण गेला वेळु कां लाविला । सेला जो भिनला मुक्ताफ़ळीं ॥८॥ बावन चंदनु मर्दिला अंगीं वो चर्चिला । कोणें सदैवें वरपडा जाला वो माये ॥९॥ बापरखुमादेविवरु माझे मानसींचा होये । तयालागी सये मी जागी सुती ॥१०॥