भजनी मालिका
← भजनांकडे परत

सूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी

sukarasi vishtha mane savakas | mishtannachi tyas kay godi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥१॥ तेवीं अभक्तांसी आवडे पाखांड । न लगे त्यां गोड परमार्थ ॥ध्रु.॥ श्वानासी भोजन दिलें पंचामृत । तरी त्याचें चित्त हाडावरी ॥२॥ तुका म्हणे सर्पा पाजिलिया क्षीर । वमितां विखार विष जालें ॥३॥