भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुगरणीबाईं थिता नास केला । गुळ तो घातला भाजीमध्यें

sugaranibain thita nas kela | gul to ghatala bhajimadhyen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुगरणीबाईं थिता नास केला । गुळ तो घातला भाजीमध्यें ॥१॥ क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ । थितें चि वोंगळ नाश केला ॥ध्रु.॥ हिरयाचे पेटे आणीयेल्या गारा । खांदी शिरी भारा व्यर्थ वाहे ॥२॥ दळण दळोनी भरीयेली पाळी । भरडोनि वोंगळी नास केला ॥३॥ कापुराचे सांते आणिला लसण । वागवितां सीण दुःख होय ॥४॥ रत्नाचा जोहारी रत्न चि पारखी । येर देखोदेखीं हातीं घेती ॥५॥ तुका म्हणे जरी योग घडे निका । न घडतां थुंका तोंडावरी ॥६॥