भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुढाळ ढाळाचें मोतीं

sudhal dhalachen motin

सुढाळ ढाळाचें मोतीं । अष्टै अंगे लवे ज्योती । जया होय प्राप्ति । तोचि लाभे ॥१॥ हातींचें निधान जाय । मग तूं करिसी काय । पोळलियावरी हाय । निवऊं पाहे ॥२॥ अमृतें भोजन घडे । कांजियानें चूळ जोडे । मग तये चरफ़डे । निती नाहीं ॥३॥ अंगा आला नाहीं घावो । तंव ठाकी येंक ठावो । बापरखुमादेविवरा-विठ्ठलु नाहीं ॥४॥