भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोयरिया करी पाहुणेरु बरा । कांडीतो ठोमरा संतालागी

soyariya kari pahuneru bara | kandito thomara santalagi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोयरिया करी पाहुणेरु बरा । कांडीतो ठोमरा संतालागी ॥१॥ गाईसी देखोनि बदाबदा मारी । घोडयाची चाकरी गोड लागे ॥ध्रु.॥ फुले पाने वेश्येसी नेतसे उदंड । देऊं नेदी खांड ब्राम्हणासी ॥२॥ बाइलेच्या गोता आवडीने पोसी । मातापितयांसी दवडोनी ॥३॥ तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥४॥