भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोवळा तो झाला । अंगीकार देवें केला

sovala to jhala | angikar deven kela

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोवळा तो झाला । अंगीकार देवें केला ॥१॥ येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ॥ध्रु.॥ चुकला हा भार । तयाची च येरझार ॥२॥ तुका म्हणे दास । झाला तया नाहीं नास ॥३॥