भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोसोनि विपत्ती । जोडी दिली तुझे हातीं

sosoni vipatti | jodi dili tujhe hatin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोसोनि विपत्ती । जोडी दिली तुझे हातीं ॥१॥ त्याचा हाचि उपकार । अंतीं आह्माशीं वेव्हार ॥ध्रु.॥ नामरूपा केला ठाव। तुज कोण म्हणतें देव ॥२॥ तुका म्हणे हरी । तुज ठाव दिला घरीं ॥३॥