भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोसियेली आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां

sosiyeli ati garbhavas phere | ayudhanche bhare vagavitan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोसियेली आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां ॥१॥ वाहोनि सकळ आपुलिये माथां । भार दासां चिंता वाहों नेदी ॥२॥ नेदी काळाचिये हातीं सेवकांसि । तुका म्हणे ऐसी ब्रिदावळी ॥३॥