भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू

sonyache parvat karavati pashan | avaghe ranoran kalpataru

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू ॥१॥ परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथें हे उपाय न सरती ॥ध्रु.॥ अमृतें सागर भरवती गंगा । म्हणवेल उगा राहें काळा ॥२॥ भूत भविष्य कळों येईल वर्तमान । करवती प्रसन्न रिद्धीसिद्धी ॥३॥ ठान मान कळों येती योगमुद्रा । नेववेल वारा ब्रम्हांडासी ॥४॥ तुका म्हणे मोक्ष राहे आलीकडे । इतर बापुडें काय तेथें ॥५॥