भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोंग संपादणी एका रुपें करी

song sampadani eka rupen kari

सोंग संपादणी एका रुपें करी । आत्मा घरोघरीं वर्ततसे ॥१॥ माय सांग आम्हां कोण सुख ब्रह्म । तुम्हा आम्हा समा कोण्या रुपें ॥२॥ चेतनें चेतवी बुध्दिते पाचारी । कल्पना मापारीया निवृत्ति ठायीं ॥३॥ ज्ञानदेव दिवटा विठ्ठलीं रमला । संसार अबोला एक तत्त्वें ॥४॥