भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोलीव जें सुख अतिसुखाहुनि । उभें तें अंगणीं वैष्णवांच्या

soliv jen sukh atisukhahuni | ubhen ten anganin vaishnavanchya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोलीव जें सुख अतिसुखाहुनि । उभें तें अंगणीं वैष्णवांच्या ॥१॥ वृंदावन सडे चौक रंग माळा । नाचे तो सोहोळा देखोनियां ॥ध्रु.॥ भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळसी कंठीं ॥२॥ नामओघ मुखीं अमृताचें सार । मस्तक पवित्र सहित रजें ॥३॥ तुका म्हणे मोक्ष भक्ताचिया मना । नये हा वासना त्याची करी ॥४॥