भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोडिलेल्या गांठी । दरुषणें कृष्णभेटी

sodilelya ganthi | darushanen krushnabheti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोडिलेल्या गांठी । दरुषणें कृष्णभेटी ॥१॥ करिती नारी अक्षवाणें । जीवभाव देती दानें ॥ध्रु.॥ उपजल्या काळें । रूपें मोहीलीं सकळें ॥२॥ तुका तेथें वारी । एकी आडोनि दुसरी ॥३॥