भजनी मालिका
← भजनांकडे परत

सिंदळीसी नाहीं पोराची पैं आस । राहे बीज त्यास काय करी

sindalisi nahin porachi pain as | rahe bij tyas kay kari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सिंदळीसी नाहीं पोराची पैं आस । राहे बीज त्यास काय करी ॥१॥ अथवा सेतीं बीज पेरिलें भाजोन । सारा देईल कोण काका त्याचा ॥२॥ तुका म्हणे नाहीं राखायाची चाड । तरि कां लिगाड करुनी घेतो ॥३॥