भजनी मालिका
← भजनांकडे परत

सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां सोडवीं संसारापासोनियां

sinalon datara karitan verajhara | atan sodavin sansarapasoniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां सोडवीं संसारापासोनियां ॥१॥ न सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसें खोडा हाडांचिया ॥ध्रु.॥ मायबापें माझीं जीवाचीं सांगाती । तीं देतील हातीं काळाचिया ॥२॥ पडताळूनि सुरी बैसली सेजारीं । यमफासा करीं घेऊनिया ॥३॥ पाठी पोटीं एकें लागलीं सरसीं । नेती नरकापाशीं ओढूनियां ॥४॥ जन साह्यभूत असे या सकळां । मी एक निराळा परदेशी ॥५॥ कोणा काकुलती नाहीं कोणे परी । तुजविण हरी कृपाळुवा ॥६॥ तुका म्हणे मज तुझाची भरवसा । म्हणऊनि आशा मोकलिली ॥७॥