भजनी मालिका
← भजनांकडे परत

सिक्का जयाचा आहे थोर । हातीं पताकांचा भार

sikka jayacha ahe thor | hatin patakancha bhar

रचनाकार: संत नरहरी · अभंग
सिक्का जयाचा आहे थोर । हातीं पताकांचा भार ॥ १ ॥ भजन होय स्थळोस्थळीं । अवघी संत हे मंडळी ॥ २ ॥ वैकुंठीची खूण । रणखांब आहे जाण ॥ ३ ॥ खांबासी भेटती जन । शिळेवरी लोळे जाण ॥ ४ ॥ पापतापही जळाले । संतचरणीं नरहरी लोळे ॥ ५ ॥