भजनी मालिका
← भजनांकडे परत

सिकविला तैसा पढों जाणे पुसां । कैंची साच दशा तैसी अंगीं

sikavila taisa padhon jane pusan | kainchi sach dasha taisi angin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सिकविला तैसा पढों जाणे पुसां । कैंची साच दशा तैसी अंगीं । स्वप्नींच्या सुखें नाहीं होत राजा । तैसा दिसे माझा अनुभव ॥१॥ कासया हा केला जिव्हे अळंकार । पायांसी अंतर दिसतसे ॥ध्रु.॥ दर्पणींचें धन हातीं ना पदरीं । डोळां दिसें परी सत्याचिये । आस केली तरी लाळ चि घोंटावी । ठकाठकी तेवीं दिसतसे ॥२॥ कवित्व रसाळ वदविली वाणी । साक्ष ही पुराणीं घडे ऐसी । तुका म्हणे गुरें राखोनि गोंवारी । माझीं म्हणे परि लाभ नाहीं ॥३॥