भजनी मालिका
← भजनांकडे परत

सिध्द सांडूनि निजबोधा गेलें

sidhda sanduni nijabodha gelen

सिध्द सांडूनि निजबोधा गेलें । निजबोधु भुललें ब्रह्मभुली ॥१॥ आठवेना माझें पूर्वजन्मग्राम । अवघाचि श्रम माझा हिरोनि नेला ॥२॥ बापरखुमादेविवरविठ्ठलें वेडावलें । आपणासहित मज ब्रह्मीं बुडविलें ॥३॥