भजनी मालिका
← भजनांकडे परत

सिद्धीचा दास नव्हें श्रुतीचा अंकिला । होईन विठ्ठला दास तुझा

siddhicha das navhen shruticha ankila | hoin viththala das tujha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सिद्धीचा दास नव्हें श्रुतीचा अंकिला । होईन विठ्ठला दास तुझा ॥१॥ सर्वकाळ सुख माझिया मानसीं । राहिलें तयासी नाश नाहीं ॥ध्रु.॥ तेणें पुण्य पाप न पाहें लोचनीं । आणिका वांचूनि पांडुरंगा ॥२॥ न करीं मी आस साधनी सायास । भक्तीप्रेमरस सांडूनियां ॥३॥ गर्भवासीं दुःख नाहीं येतां जातां । हृदयीं असतां नाम तुझें ॥४॥ तुका म्हणे तुझा होईन अंकिला । न भें मी विठ्ठला कळिकाळासी ॥५॥