भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्वान अथवा सुकर होका मार्जार । परी वैष्णवाचें घर देईं देवा

shvan athava sukar hoka marjar | pari vaishnavachen ghar dein deva

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
श्वान अथवा सुकर होका मार्जार । परी वैष्णवाचें घर देईं देवा ॥१॥ तेणें समाधान होय माझ्या जीवा । न भाकीं कींव आणिकासी ॥२॥ उच्छिष्ट प्रसाद सेवीन धणिवरी । लोळेन परवरी कवतुकाने ॥३॥ चोखा म्हणे कोणी जातां पंढरीसी । दंडवत त्यासी घालीन सुखें ॥४॥