भजनी मालिका
← भजनांकडे परत

शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल

shuratvasi mol | naye kama phike bol

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥१॥ केला न संडी कैवाड । जीवेंसाठी तों हे होड ॥ध्रु.॥ धीर तो कारण । साह्य होतो नारायण ॥२॥ तुका म्हणे हरी । दासां रिक्षतो निर्धारीं ॥३॥