भजनी मालिका
← भजनांकडे परत

शून्याशून्य धार शून्यशेजे हरी

shunyashunya dhar shunyasheje hari

शून्याशून्य धार शून्यशेजे हरी । शून्यामाजि घरीं बिंबलासे ॥१॥ आधीं आप पाही शून्या शून्य देहीं । मज उमजोनी ठायीं घेईजे सुख ॥२॥ शून्य ते कांई शून्याशून्य पुशिलें । ह्रदयस्था जालें कोण्या गुणें ॥३॥ बापरखुमादेविवर विठ्ठल अवघा । शून्याशून्य वेगा ज्ञानघन ॥४॥