भजनी मालिका
← भजनांकडे परत

शून्याचें भुवनी स्वरुप अविनाश

shunyachen bhuvani svarup avinash

शून्याचें भुवनी स्वरुप अविनाश । प्रणवीं पुरुष दिसतसे ॥१॥ निळा रंग देखें सर्वाचे देखणीं । चैतन्य भुवनीं समरस ॥२॥ ज्ञानदेवा ध्यान सच्चिदानंदाचें । सर्व ब्रह्म साचे येणें येथें ॥३॥