भजनी मालिका
← भजनांकडे परत

शून्याचा शेवट डोळा पाहा निराळा

shunyacha shevat dola paha nirala

शून्याचा शेवट डोळा पाहा निराळा । निळबिंदु सावळा प्रकाशला ॥१॥ ब्रह्म ज्योतिरुप विसावले जेथ । अनुभव साद्यंत पहा तुम्ही ॥२॥ ऐसे कैलासनाथें सांगितलें पार्वती । ज्ञानदेवा निवृत्ति तेंचि सांगे ॥३॥