भजनी मालिका
← भजनांकडे परत

शून्य शोधिलें नाहीं जेणें

shunya shodhilen nahin jenen

शून्य शोधिलें नाहीं जेणें । काय विवरण केले तेणें । अज्ञानपणें फुगणें । गाढव जीणें पशूचें ॥१॥ वर्णाकृति शून्याचार । हा नाहीं ज्या विचार । न घडे न घडे साक्षात्कार । जाण सर्वथा तया नरा ॥२॥ आधीं शून्याची शोधणी केली । मग सदवस्तू प्राप्ति झाली । अमृत वेळाची बोली । बोलतां नये ॥३॥ आधीं शून्य तें शुभ्रवर्ण । मध्यें श्वेत रचिलें जाण । अर्ध्य शून्य तें ताम्रवर्ण प्रत्यक्ष जाण दिसतसे ॥४॥ महाशून्याचा वर्ण निळा । अव्यक्त तेजाचा ओतिला गोळा । ग्रासूनी ठेला भूगोळा । योगी डोळा पाहती ॥५॥ ऐसें शून्याचें नाहीं ज्ञान । तंववरी अवघेंच अज्ञान जनीं अवघा जनार्दन । अज्ञान सज्ञान काय बोलूं ॥६॥ निवृत्तिराजें बोलाविली बोली । तेंची बोलीं बोलिलों ॥७॥