भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षिती लाहो दिसां सातां

shukasanakadikin ubharila baho | parikshiti laho disan satan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षिती लाहो दिसां सातां ॥१॥ उठा उठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥ त्वरा झाली गरुडा टाकियेला मागें । द्रौपदीच्या लागें नारायणें ॥२॥ तुका म्हणे करी बहुत तांतडी । प्रेमाची आवडी लोभ फार ॥३॥