भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुध्दमतीगती मज वोळला निवृत्ती

shudhdamatigati maj volala nivrutti

शुध्दमतीगती मज वोळला निवृत्ती । त्यानें पदीं पदीं प्रीति स्वरुपीं वो माय ॥१॥ आतां मी जाईन आपुलिया गांवा । होईल विसावा सुखसागरीं वो माय ॥२॥ पाहातां न देखे आपुलें कोणी नाहीं । निजरुप पाहीं अनंता नयनीं वो माय ॥३॥ हा रखुमादेविवरु गुरुगम्य सागरु । न करीच अव्हेरु माझा वो माय ॥४॥