भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुद्धाशुद्ध निवडे कैसें । चर्म मास भिन्न नाहीं

shuddhashuddha nivade kaisen | charma mas bhinna nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शुद्धाशुद्ध निवडे कैसें । चर्म मास भिन्न नाहीं ॥१॥ कांहीं अधिक नाहीं उणें । कवण्या गुणें देवासी ॥ध्रु.॥ उदक भिन्न असे काई । वोहाळ बावी सरिता नई ॥२॥ सूर्य तेजें निवडी काय । रश्मी रसा सकळा खाय ॥३॥ वर्णां भिन्न दुधा नाहीं । सकळा गाई सारखें ॥४॥ करितां भिन्न नाहीं माती । मडक्या गति भिन्न नांवें ॥५॥ वर्त्ते एकविध अग्नी । नाहीं मनीं शुद्धाशुद्ध ॥६॥ तुका म्हणे पात्र चाड । किंवा विष अमृत गोड ॥७॥