भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन । लागत चि धन नाहीं वित्त

shuddha charya hen chi santachen pujan | lagat chi dhan nahin vitta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन । लागत चि धन नाहीं वित्त ॥१॥ सगुणाचे सोई सगुण विश्रांती । आपण चि येती चोजवीत ॥ध्रु.॥ कीर्तनीं चि वोळे कृपेचा वोरस । दुरीपणें वास संनिधता ॥२॥ तुका म्हणे वर्म सांगतों सवंगें । मन लावा लागें स्वहिताच्या ॥३॥