भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुद्ध भाव शुद्धमती । ऐसें पुराणें वदती

shuddha bhav shuddhamati | aisen puranen vadati

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
शुद्ध भाव शुद्धमती । ऐसें पुराणें वदती ॥१॥ जयासाठीं जप तप । तो हा विश्वाचाचि बाप ॥२॥ नामें पातकी तारिले । जड जीव उद्धरिले ॥३॥ विश्वास दृढ धरा मनीं । चोखा मिठी घाली चरणीं ॥४॥