भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रृंगार करुनि हरिनामतांबूल

shrrungar karuni harinamatambul

श्रृंगार करुनि हरिनामतांबूल गुरुअंजन लेउन डोळा । भ्रातारु होता तो नि:शब्दीं खिळिला परतोनि माघारि ठेलिये ॥१॥ काम निदसुरा कामिनी जागे कांही के विपरित गमे । भोगत्याच्या ठाई निशब्दीं खिळिला आपआपण्यातें रमे ॥२॥ पति पद्मिणीविणें गर्भ संभवला सवेचि प्रसूति जाली । तत्त्वबोध उपजला तेणें गुढी उभविली ॥३॥ तया पुत्राचेनि सुखें सर्वहि विसरलें देहभावा पडला विसरु । बापरखुमादेविवरु विठ्ठलीं तेथें आणिकाचा नव्हे संचारुगे बाईये ॥४॥