भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा

shrigurusarikha asatan pathirakha

श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ॥१॥ राजयाची कांता काय भीक मागे । मनाचिया जोगे सिध्दि पावे ॥२॥ कल्पतरुतळवटीं जो कोणी बैसला । काय वाणी त्याला सांगिजोजी ॥३॥ ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों । आतां उध्दरलों गुरुकृपें ॥४॥