भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तूं जाण श्रुतिदास

shikha sutra tujha guntala jaman | tanvavari tun jan shrutidas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तूं जाण श्रुतिदास ॥१॥ त्याची तुज कांहीं चुकतां चि नीत । होसील पतित नरकवासी ॥ध्रु.॥ बहु झालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुकों नको ॥२॥ शिखा सूत्र याचा तोडीं तूं संबंध । मग तुज बाध नाहींनाहीं ॥३॥ तुका म्हणे तरि वर्तूनि निराळा । उमटती कळा ब्रम्हींचिया ॥४॥