भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिकल्या शब्दाचें उत्पादितों ज्ञान । दर्पणींचें धन उपर वाया

shikalya shabdachen utpaditon dnyan | darpaninchen dhan upar vaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शिकल्या शब्दाचें उत्पादितों ज्ञान । दर्पणींचें धन उपर वाया ॥१॥ अनुभव कइं होईंन भोगिता । सांकडें तें आतां हें चि आलें ॥ध्रु.॥ गायें नाचें करीं शरीराचे धर्म । बीजनाम वर्म तुमचें दान ॥२॥ तुका म्हणे केला उशीर न साहे । द्याल तरी आहे सर्व सद्धि ॥३॥