भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिजल्यावरी जाळ । वांयां जायाचें तें मूळ

shijalyavari jal | vanyan jayachen ten mul

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शिजल्यावरी जाळ । वांयां जायाचें तें मूळ ॥१॥ ऐसा वारावा तो श्रम । अतिशयीं नाहीं काम ॥ध्रु.॥ सांभाळावें वर्म । उचिताच्या काळें धर्म ॥२॥ तुका म्हणे कळे । ऐसें कारणाचे वेळे ॥३॥