भजनी मालिका
← भजनांकडे परत

शास्त्रार्थाची वाणी निरंजणी दीसे

shastrarthachi vani niranjani dise

शास्त्रार्थाची वाणी निरंजणी दीसे । औटपिठीं वसे निर्विकार ॥१॥ अहं सोहं मग ॐकाराचे देठीं । अहंतेचे शेवटीं सोहं वस्तू ॥२॥ सोहं वस्तु निळी अहं गेलीया । आनंद झालीया महाकरणीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची आण । या वेगळी खूण आणिक नाहीं ॥४॥