भजनी मालिका
← भजनांकडे परत

शास्त्राचें जें सार वेदांची जो मूर्ति । तो माझा सांगाती प्राणसखा

shastrachen jen sar vedanchi jo murti | to majha sangati pranasakha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शास्त्राचें जें सार वेदांची जो मूर्ति । तो माझा सांगाती प्राणसखा ॥१॥ म्हणउनी नाहीं आणिकांचा पांग । सर्व जालें सांग नामें एका ॥ध्रु.॥ सगुण निर्गुण जयाचींये अंगें । तोचि आम्हां संगें क्रीडा करी ॥२॥ तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभ आइते केले नव्हों ॥३॥