भजनी मालिका
← भजनांकडे परत

शर्करेची गोडी निवडावया भले

sharkarechi godi nivadavaya bhale

शर्करेची गोडी निवडावया भले । साधु निवडिले सत्संगती ॥१॥ सत्संगे प्रमाण जाणावया हरी । येर ते निर्धारी प्रपंचजात ॥२॥ भानुबिंब पाहा निर्मळ निराळा । अलिप्त सकळ तैसे साधु ॥३॥ ज्ञानदेव हरि जपोनि निर्मळ । सदा असे सोज्वळ निवृत्तिसंगें ॥४॥