भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा विनवणी

sharan sharan vani | sharan trivacha vinavani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा विनवणी ॥१॥ स्तुती न पुरे हे वाचा । सत्य दास मी दासांचा ॥ध्रु.॥ देह सांभाळून । पायांवरी लोटांगण ॥२॥ विनवी तुका संता दीन । नोहे गौरवें उत्तीर्ण ॥३॥